सिटी बेल लाइव्ह / कथा कट्टा #
माझे आजोबा कै. वेडू आण्णासो. मला लहानपणी नियमित गोष्टी सांगत त्यातील आठवणीतील गोष्ट….
एक कुटुंब असतं. त्या कुटूंबात एक वयोवृद्ध म्हातारे गृहस्थ त्यांचा मुलगा, सुनबाई आणि नातु असे छोटंसं चार जणांचे कुटूंब लहान असतं.. म्हातारे बाबा खूपच वृद्ध असल्या मुळे बाहेर फिरायला किंवा कुठं जायचा विषयच नसतो. अंगात कुठलाच त्राण नसतो नुसतं घरीच अंथरुणात पडून राहतात. तेथेच उठ बस जेवण करतात. त्यांचा मुलगा नोकरीला असतो. मुलगा त्यांची हि अवस्था पाहून एक घोंगडी (घोंगडी.. पूर्वी पावसाळ्यात मागील बाजूस डोक्या वरून खालपर्यंत सोडतं. रेनकोट सारखं… पावसात भिजू नये म्हणून.. नंन्तर सतरंजी सारखं कुठं झोपायला पण टाकून दिली की कामात येई… ) आणून देतो. आणि घरातील एका कोपऱ्यात टाकतो. वडिलांना सांगतो हया घोंगडी वर बसत चला. झोपायला पण होईल. वडिलांना त्यांची जागा दाखवून देतो. बिचारे तेथेच उठ बस जेवण करतात. तेथेच एक कोपऱ्यात जाऊन बसत असतात. असाच दिनक्रम त्यांचा सुरु असतो. असं करत करत काही दिवस निघून जातात घोंगडी जीर्ण होऊन जाते फाटकी होते. तरी तसंच रहात असतात. एक दिवस नं राहवून मुलास सांगतात बेटा हि घोंगडी खुप जीर्ण झाली रे खूपच फाटली बघ कसे छिद्रे पडलेत तिला फाटकी झाली मला दुसरी घोंगडी आणुन देशील तर बरं होईल… मुलगा म्हणतो बरं ठीक आहे आणतो आज.. असं करत काही दिवस जातात.. एक दिवस मुलगा नवीन घोंगडी आणतो बाजारातून आणि आपल्या मुलास सांगतो. जा बेटा बाबांना हि नवीन घोंगडी देऊन ये. शाळेत जाणारा मुलगा लहान असतो. तो घोंगडी घेतो आणि लगेच तिला बरोबर अर्ध्या तुन वडीलां समोरच दोन भाग करायला लागतो. ते पाहून त्याचे वडील म्हणतात. अरे अरे हे काय करतोय बाबांना लहान होईल की घोंगडी? त्यांना त्याच्यावर कसं झोपता येईल? मुलगा लगेच उत्तर देतो .. अहो बाबा वारले की मी मोठा होईल ना. तेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल. त्यावेळी मला नवीन घोंगडी आणायला नको हिच अर्धी घोंगडी तुम्हाला देईन .. तेव्हा त्याचे वडील निशब्द होतात काय बोलावं.. त्यांचे डोळे उघडतात. त्या दिवशीच ते स्वतःच्या वडिलांना पुढच्या खोलीत नेतात आणि चांगलं अंथरून वगैरे सारं सारं देतात त्या दिवसा पासून आपल्या वृद्ध वडिलांची सेवा करू लागतात.
1) जसं कराल तसं भराल.
2) जे पेराल तेच उगवेल.
3) आपण आपल्या आईवडिलांना चांगले वागलो तरच आपली मुले आपल्या सोबत चांगलं वागतील..
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा जळगाव
मो. 9922239055©️®️
Be First to Comment