विचारधारा-७ *प्रारब्ध*
एखादी गोष्ट ही भाग्यानुसार घडते त्यालाच आपण प्रारब्धयोग म्हणतो.
पूर्वसुकृतांचा ठेवा जीवनी देई सुदैवाचा मेवा;
तरी हे मानवा, नित्य चालू ठेव सत्कर्मरुपी सेवा…
आपल्याला मिळणारा चांगला-वाईट प्रारब्धयोग हा पूर्णतः सत्कर्म-दुष्कर्म यांवर अवलंबून असतो.
उदाहरण
एखादा मनुष्य श्रीमंत कुळात जन्माला येणे. हे त्याचे पूर्वसंचित असते पण त्याने त्या श्रीमंतीचा माज करून जर मनमानी केली व सत्कर्मे केली नाहीत तर जोपर्यंत पूर्वसंचिताचे फल म्हणून पैसा आहे तोपर्यंत सर्व ठीक पण नंतर मात्र त्यास दुर्दैवी प्राप्त होऊन अधोगतीकडे झुकावे लागते.
आपण म्हणतो की, लक्ष्मी म्हणजे पैसा हा चंचल आहे. पण तसे नाही तर हे सर्व प्रारब्धावर आधारित असते.
प्रारब्धाने नांदे लक्ष्मी,
प्रारब्धानेच सोडे लक्ष्मी,
प्रारब्धानुसार बुद्धि,
अन् बुद्धीनुसार कर्म…
म्हणून संतांनीही कर्माला महत्त्व देऊन म्हटले आहे की, सत्कर्मयोगे वय घालवावे की मग निदान पुढच्या आयुष्यात प्रारब्धानुसार सुखरुपी गोड फळेच चाखायला मिळतील.
✍️लेखिका✍️
श्वेता जोशी., नवीन पनवेल







Be First to Comment