Press "Enter" to skip to content

माझा स्वभाव

माझा स्वभाव

मी असा खूप स्पष्ट
म्हणून कदाचित तुसडा म्हणती
नावे ठेवून मला हिणवती
तरीही असा मी खूप स्पष्ट

चुकलो नकळत कधीमधी मी
हात जोडले क्षमा मागूनी
जगणे केले निर्मळ माझे
स्पष्ट बोलूनी स्पष्ट राहूनी
मी इतरांशी कधी स्वतःशी

सोडून गेले तुसडा म्हणूनी
नव्हते माझे ते तर कोणी
सखे सोबती जे जे टिकले
जीवलग झाले मित्र होऊनी
साठीच्या या उंबरठ्यावर
वृक्ष बहरला शीतल होऊन
वृक्ष बहरला शीतल होऊन

अनंत खोत, विलेपार्ले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.