तू सोडून गेलीस तरी
तू सोडून गेलीस तरी
हृदयात माझ्या
तुझ्या स्मृतीचा गंध आहे
तू सोडून गेलीस तरी
डोळ्यात माज्या
तूझ्या प्रतिमेचा वास आहे
तू सोडून गेलीस तरी
डोक्यात माझ्या
तुझाच नित्य विचार आहे
तू सोडून गेलीस तरी
शयनगृहात आपल्या
श्रुगाराच्या स्मृती अमर आहेत
तू सोडून गेलीस तरी
स्वयंपाक घरात आपल्या
तुज्या पाक कलेची चव जिभेवर आहे
तू सोडून गेलीस तरी
नातीमध्ये आपल्या
तुझीच छबी आहे
तू सोडून गेलीस तरी
घरामध्ये आपल्या
सतत तुझाच वास आहे
तू सोडून गेलीस तरी
तूझ्या आठवणी
माझ्या मनांत ठायी ठायी
तू सोडून गेलीस तरी
माझा एकही दिवस
तुझा आठ्वणीशिवाय जात नाही
तू सोडून गेलीस तरी
तूझ्या मायेचा कृपाप्रसाद
आम्हावर सदा राही
तू सोडून गेलीस तरी
या जीवघेण्या एकांतात
फक्त तुझीच सोबत आहे
तू सोडून गेलीस तरी
माझ्या मनात
तुझ्याच भेटीची आस आहे
विलास चव्हाण, सातारा







Be First to Comment