Press "Enter" to skip to content

प्रार्थना

प्रार्थना

दुसऱ्याच्या यशात जर कोणाला दुःख होत असेल तर असे दुःख आपल्या वाट्याला कधी न येवो अशी प्रार्थना करावी

स्तुती करण्यास जर कंजुषी दिसत असेल
तर असा नतद्रष्टपणा आपल्या वाट्याला कधी न येवो
आपण आपली दानत वाढवावी

सत्तेचा मोह आवरता येत नाही असे दिसले
तर असा मोह आपल्याला कधी न होवो
आपण त्यागात धन्यता मानावी

यशशिखरे चढणाऱ्या बद्दल कोणास
असूया वाटत असेल
तर अशी वृत्ती आपल्यात
कधी न येवो
आपण यशातून प्रेरणा
मिळवावी

विनया वाळिंबे, कामोठे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.