गारूड
गारूड तुझ्या शब्दांचे
नखशिखांत निथळत गेले
अस्तित्व नगण्यच माझे
बघ ठळक नव्याने झाले
तो चंद्र मला हसलाही
मी हसण्यावारी नेले
का गर्भित सारे अर्थ
काळाने उद्धृत केले
काव्यात गुंफता यावे
शब्दांचे अगणित झेले
आशेत शेवटी काही
शब्दांना अंकित केले
तावांवर ओघळताना
कढ शाईचेही सुकले
पण तुझ्याच शब्दांसाठी
जन्मणे पुन्हा मज रुचले
निलिमा देशपांडे, नवीन पनवेल.







Be First to Comment