अनुभूती..
तिन्हीसांज झाली
उन्हेही कलली
मावळती कशी
गालात लाजली ||१||
केशरी रंगाची
पसरण झाली
मंद पावलाने
उषा दारी आली ||२||
तारकांचे नभी
लुकलुके डोळे
प्रसन्न रजनी
घेतसे हिंदोळे ||३||
चंद्रही जरासा
मनात हसला
तारकांसोबती
निवांत रमला ||४||
हळूहळू अशी
रात्र सरु लागे
गोड स्वप्ने सारी
डोळ्यातच जागे ||५||
दिनकर आता
पुन्हा सज्ज झाला
केशराचा टिळा
पूर्व दिशी आला ||६||
सौ. सुजाता कुलकर्णी, आदई







Be First to Comment