Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

मुलाचे प्राण वाचवणाऱ्या मयूर सखाराम शेळके च्या चित्तथरारक धाडसावर कविश्री.अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता

देवदूत- मयूर शेळके !

अचानक आईच्या हातून

मुलाचा हात निसटला

स्टेशन लगतच्या रूळावर

मुलगा खाली कोसळला...

काहीच दुरीवर आगगाडी

अती वेगाने येतच होती

काळजाच्या तुकड्याला

अंध माय मुकणार होती...

मयूर सखाराम शेळके ने

जीवाची परवा नाही केली

पडलेल्या त्या मुलाकडे

प्राण बाजीने धाव घेतली...

मुलाला हाती धरून मयूर

क्षणार्धात स्टेशनवर चढला

यमदूताला परतवणारा मयूर

मुलासाठी देवदूत ठरला.. !!

कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो.-9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.