Press "Enter" to skip to content

सुख म्हणजे नक्की काय असतं??

सुख म्हणजे नक्की काय असतं??

सुख म्हणजे नक्की काय असतं??
मे महिन्याच्या सुट्टीतील मामाचं घर असतं
गणगोता बरोबर बसणारी पंगत असतं
गरम वरण-भातावर तुपाची धार असतं
आंबे खाताना माखलेलं तोंड असतं
पातेल्याला चिकटलेली उकडीची खरपुडी असतं
झोपाळ्यावर आजीची गोष्ट ऐकत येणारी पेंग असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं??
शाळेत तास चालू असताना चोरून खाल्लेली चिंच असतं
दोन मित्रांनी मिळून तिसऱ्याची काढलेली खोडी असतं
मोकळ्या वेळेत गुरुजींची केलेली नक्कल असतं
परीक्षेत जिवलग मित्राला गुपचूप केलेली मदत असतं
स्नेहसंमेलनासाठी बसवलेल्या नाटकाची तालीम असतं
शाळा सुटल्यावर घरी न जाता चोरून खाल्लेल्या कैर्‍या असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं???
मैत्रिणींमध्ये खळखळून हसताना तिला बघणं असतं
चोरून लिहिलेल्या प्रेमाच्या कबुलीचं गुलाबी पत्रं असतं
बागेत तिला एकटीला भेटताना दिलेलं गुलाबाचं फूल असतं
लग्नाची मागणी घालतानाचं तिचं लाजणं असतं
लग्नानंतरच्या मधुर मिलनाची चांदरात असतं
दिवस गेल्याच्या गोड बातमीची उबदार कव असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं???
मुलांबरोबर गप्पा मारत रात्र रात्र जागणं असतं
मुलांचे लाड पुरवताना घेतलेले कष्ट असतं
एकेक यशाची पायरी चढताना झालेला आनंद असतं
त्यांच्या पंखात बळ येतानाचं बघणं असतं
मुलांचे निर्णय त्यांचे ते घेताना अचंबित होणं असतं
सून जावयाचं हसतमुखाने केलेलं स्वागत असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं???
छोट्या छोट्या गोष्टीत ठायी ठायी भरलेलं असतं
समाधानाच्या सोबतीनं सजवायचं असतं
एकमेकांना उत्स्फूर्त आनंद वाटण्यात असतं
अडलेल्याला बिनाशर्त मदत करण्यात असतं
परदुःख आपल्यापरीने हलकं करण्यात असतं
माणसाने माणसाशी माणसासारखं वागण्यात असतं
..
.स्वाती लेले नवीन पनवेल

One Comment

  1. Hemchandra Sane Hemchandra Sane April 23, 2021

    Khoop chhan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.