॥श्रीराम॥
पवित्र पावन भारत भू
असे साऱ्याना अभिमान
महापुरूषांनी घडवलेली
आमुची संस्कृती महान
मर्यादा पुरूषोत्तम श्री राम
महाविष्णूचा दशावतार
जनतेचा कैवारी राजा
राम सातवा अवतार
सत्य वचनी ,तेजःपुंज
राम वात्सल्याची मूर्ती
पुत्र दशरथ नंदनाची
जगभरात असे कीर्ती
कर्तव्य , निष्ठा , औदार्य
राम मातृवचनी वंदनीय
कौसल्या मातेचा सूत
राम सदा आचरनीय
मांगल्याचा तेजोनिधी
करी दुष्टांचे निर्दालन
त्रेतायुगात येऊन केले
हिंदू धर्माचे रक्षण
रयतेचा राजा राम
करण्या राक्षसांचा संहार
स्पर्श करून शिळेला
केला अहिल्येचा उद्धार
पुनर्जन्म वाल्मीकीचा
जन्मे गीतरामायण
रामकथा ही अक्षय
करू नित्य पारायण
संगीता थोरात, नवीन पनवेल .







Be First to Comment