कुशी
शिणलेल्या या मनाला नको कापसाची उशी
भूल वेदनेला पाडी माझ्या आईची ती कुशी…
माझ्या आईची ती कुशी जणू स्वर्गीयाचे सुख विसावल्याने सरते मनातील सारे दुःख…
मनातील सारे दुःख कसे क्षणात सरते
तिच्या वात्सल्याची ऊब जेव्हा मना खुणावते…
जेव्हा मना खुणावते तिच्या मायेची फुंकर
वाटे दुणावत जावा तिच्या मायेचा सागर….
श्रावणी अनिरुद्ध भिडे, पनवेल







Be First to Comment