Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा : कवी अजय शिवकर यांची कविता

झाली तेवढी शिक्षा,पुरे आता देवा
तुझ्या विना कोणी नाही,विचार मनी ठेवा

थांबव हा खेळ, किती खेळशील जीवांशी,
साऱ्यांचेच आरोप,तुझ्याच नावाशी…
आमच्यावरचा राग देवा,आता तरी जावा.
तुझ्या विना कोणी नाही,विचार मनी ठेवा

संकटाच्या वेळी अवतार मी घेतो,
तुझ्याच वचनाची आठवण करून देतो,
ठेव तुझ्या वचनाची आठवण देवा,
तुझ्या विना कोणी नाही,विचार मनी ठेवा

चुका झाल्या आमच्या कडून,
असेल तुला राग,
अरे ! पण तू देव आहेस,
देवा सारखाच वाग..
आमच्या वरचा राग देवा,
आता तरी जावा..
तुझ्या विना कोणी नाही,विचार मनी ठेवा

महामारीवर उपाय करून ,
सारे जग थकले.
तूच आता वाचव देवा,
सर्वांनी हात टेकले,
जगाच्याह्या उद्धारासाठी,
मार्ग तुम्ही दावा..
तुझ्या विना कोणी नाही,विचार मनी ठेवा

कळून चुकले आम्हा देवा,
माणूसकी झाली लोप,
म्हणूनच हा निसर्गाचा
जगावर झाला कोप…
चुक आमची सुधारू ..
तुम्ही विश्वास ठेवा..
तुझ्या विना कोणी नाही,विचार मनी ठेवा

शब्दाला तुझ्या आता तरी जाग
नाहीतर तुझ्या नावाला लागेल दाग
लेकरांच्या चुका पदरात घ्यावा
तुझ्या विना कोणी नाही,विचार मनी ठेवा

अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.