अनिरुद्ध ने साकारली जगातील सर्वात लहान अंडर वाॅटर पोर्ट्रेट रांगोळी
सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।
नांदगावचा रंगावलीकार अनिरुध्द संदिप खेडेकर याने साकारलेली जगातील सर्वात लहान अंडर वाॅटर पोर्ट्रेट रांगोळीची आशिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद करण्यात आल्याने त्याच्यावर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सदर 4 बाय 4 से.मी.आकाराची अंडर वाॅटर पोर्ट्रेट काढून आशिया खंडातील विश्वविक्रम नमूद केल्या जाणार्या आशिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये उभा हिंदुस्तान यांना ‘शेर सिंहाचा छावा’ म्हणून संबोधित केले जाते त्या आपले आराध्य छत्रपती संभाजी महाराज भोसले यांचे पोर्ट्रेट रांगोळी पाण्याखाली काढून दि.17 मार्च 2021 रोजी 36 भिनिटे 39 सेकंद या वेळेत पूर्ण करुन विश्व विक्रम प्रस्थापित केला.
सदर विश्व विक्रमी रांगोळी साकारण्यासाठी गुरु सतिश जोशी,रंगावलीकार मित्र,लेखक व कवी जयंत शिगवण, रंगावलीकार अक्षय शहापूरकर आदिंनी मोलाची मदत व मार्गदर्शन केले.













Be First to Comment