निसर्ग किमया
पानगळती सुरू झाली,
राने ओसाड दिसू लागली,
भकास माळरानावरती,
वृक्ष बोडके दिसू लागती,
तीव्र उन्हाच्या झळा उठती,
अंगाअंगा झोंबू लागती,
लाहीलाही अंगाची होउनी,
तगमग ही वाढवीत जाई,
परी चैत्राची चाहूल लागता,
ओसाड माळरान बहरू लागला,
हिरव्या तृण अंकुरांनी फुलला,
वृक्ष ही नव पालवीने बहरला,
धुंद सुगंधी मंद वारे,
आमराईत घुमू लागले,
बहरलेल्या मोहराने,
कोकिळ गुंजन सुरू झाले,
निसर्गाची किमया न्यारी,
रंगाची उधळण झाली,
रंगबिरंगी सुगंधी फुलांनी,
उद्याने ती सजली धजली,
मरगळलेल्या मानवी मनाला,
नवी उभारी देऊनी गेली,
चैत्रातील मोहक दृश्यांनी,
तनमन हे भरून जाई.
नयना पेंढारकर, नवीन पनवेल







Be First to Comment