


श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज, गव्हाण–कोपर येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या महान शैक्षणिक कार्याला आदरांजली वाहिली. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र केसरी एसीपी विजय चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कर्मवीरांच्या “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” या विचारांना अभिवादन करत गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.



Be First to Comment