Press "Enter" to skip to content

विचारधारा-५

विचारधारा-५

मानसिकता

ढळता-बिघडता मानसिकता कधी मानवाची;
हाल न पाहवे तरी अशा कित्येकांचे जगी…
प्रत्येक माणूस हा सर्वस्वी त्याच्या मानसिकतेवर स्वकार्य करीत असतो. सर्वसाधारणपणे आजकाल मनोरुग्णांची संख्या ही बालवर्गापासून वृद्धवर्गापर्यंत झपाट्याने वाढत आहे.
तरुणवर्गात तर सारासार विचार करण्याची क्षमता जणू लोप पावली आहे. यासाठी एकमेव पर्यायी समाधान म्हणजे मनोरुग्णतज्ञ नव्हे तर आपण स्वतः कुटुंबीयजन आहोत.
एखाद्याला मनोरुग्ण ठरवण्याआधी त्यामागील कारणे व त्यातील तथ्य जाणून घेणे तसेच त्यानुसार कृतीत बदलाव करणे हे आपल्याला सहज शक्य असते. पण आपण तसे करीत नाही. याला कारण आपल्यातही सहनशक्तीच्या कमतरतेची पोकळी असते.
एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नाही पण ती गोष्ट पुन्हा पुन्हा त्या समोर घडणे वा घडवणे व ती व्यक्ती त्यावर मग नकारात्मक प्रतिसाद देणे म्हणजे खरा मनोरुग्ण नव्हे तर जो ती न आवडणारी गोष्ट त्या व्यक्तीपुढे पुन्हा पुन्हा मुद्दामून मांडतो तो खरा मनोरुग्ण असतो.
पण भावनेपोटी आपणांस या गोष्टी लक्षात न येता आपण मनोरुग्ण ठरवत त्या व्यक्तीस मनोरुग्णतज्ञांकडे घेऊन जातो; जिथे पैशाच्या लालसेने औषधे देऊन काही प्रमाणात आटोक्यात आणल्याचे दाखवले जाते. मात्र त्या व्यक्तीवर विनाकारण कायमचा मनोरुग्ण हा ठप्पा पडतो.
प्रत्येक गोष्टीचे मूळ शोधले तर आनंदच आनंद आहे. म्हणून तर वामनराव पै यांसारखे सत्पुरुषही म्हणतात की, “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.

✍️ लेखिका ✍️
श्वेता जोशी.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.