गुढी
प्रत्येक माणसाच्या मनात
सद्विचारांची गुढी असावी
जिथे त्या विचारांच्या उंचीवर
कोणती मर्यादा नसावी..
लळा जिव्हाळा व्हावा
नेहमी साखरेचा हार
सौजन्याचे मनांत सदैव
सताड उघडे दार..
कडुलिंबाच्या तुर्यावाणी
थोरामोठ्यांची शिकवण
राहू द्यावी निरंतर मनात
निखळ प्रेमाची साठवण..
गुळासारखी वाढू द्यावी
नात्या- नात्यात गोडी
कर्तव्य आदर निष्ठा
जपावी जिव्हे आवडी..
मनामनातील अढीला सागरा
विसर्जित करावे
भेगाळलेल्या अंतराला
आपुलकीने हासत भरावे
संगीता थोरात.
नवीन पनवेल .







Be First to Comment