Press "Enter" to skip to content

आई

आई

आई ग आई, आई ग आई
तु आहेस कुठे माझी आई
आई ग आई ,आई ग आई

जन्म दिला तु कष्ट करुनी
मला वाढवली तु लाडानी
तु माझी प्रेमळ आई, ग आई

जन्मानंतरची तुझी शिकवणी
मी मोठी झाले, तुझ्या लाडाने
कशी जाऊ तुला सोडून, ग आई

तुला सोडून मी सासरी आले
सासुच्या रुपांनी तु मिळाली
कशी सांगू मी तुला, ग आई.

तुझ्या दुधाचे ऋण,मी कशी फेडू आई
तुझ्या शीतल छायेत, मला निजु दे
तुझ्या मायेचा हाथ डोक्यावर फिरु दे.
आई ग आई, आई ग आई.

अपराजिता घांगुर्डे, खांदा कॉलनी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.