Press "Enter" to skip to content

बिल्वपत्र

बिल्वपत्र

तू भोळा सांब म्हणे कोणी
जटा चंद्रमा दाविती कोणी
निळकंठ दिगंबर ध्यानस्थ
वसशी कैलाशी सांगे कोणी

गोष्टी सांगती कथा सांगती
तव लिला अगणित वर्णिती
त्रिनेत्राचे भयही दाविती
संहारक तारक म्हणती

रूप तुझे तरी आकळेना
नेत्री दिसेना बुद्धीस पटेना
अवतीर्ण होशील अज्ञातातून
मनास हा ध्यास जडेना

शवात माझ्या शक्ती आहे
तिथेच तुझा वास असावा
श्वास उच्छवास चाले निरंतर
त्यात तुझाच हात असावा

असेच काही वाटे मजला
परी अंतरी उतरावे कोणी
तुला शोधाया दिगंती फिरलो
वाट आतली दावावी कोणी

तूच आता हुंकार द्यावा
आस माझी पुरी करावी
बिल्व पत्रे निर्माल्य झाली
सत्कर्मातून पूजा घडावी

सृष्टी गुजराथी, कर्जत

One Comment

  1. Mayuresh adkar Mayuresh adkar April 5, 2021

    खूप सुंदर लिहिलं आहे
    जय भोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.