संपूर्ण पोलिस दलाची कुटुंबाप्रमाणे काळजी घेणाऱ्या आयुक्तांचा अभिमान वाटतो : रवीशेठ पाटील
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
कोरोना विषाणू ने समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा फटका दिला आहे. कोविड योद्ध्यांच्या अग्रभागी तैनात असणाऱ्यांच्या सुद्धा अग्रस्थानी असतात ते पोलीस बांधव! ना पी पी ई किट चे संरक्षण ना पोटभर अन्नाची शाश्वती अशा खडतर परिस्थितीत पोलीस दल या विषाणूच्या महामारी मध्ये संचार बंदी करण्यासाठी झटत होते. अर्थातच कोरोना विषाणू माणसामाणसांत फरक करत नसल्यामुळे पोलीस बांधव देखील त्याच्या दुष्टचक्राच्या फेऱ्यातून येऊ लागले.पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यांच्या उपचारासाठी एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे धावून येणारे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या नियोजन कौशल्याची श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे उपाध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा करताना रवीशेठ पाटील म्हणाले की संजय कुमार साहेब हे संक्रमणाची पर्वा न करता कळंबोली मुख्यालयात,नेरूळ येथे उभारलेल्या पोलीस covid सेंटर येथे भेट देऊन आस्थेने सार्यांची चौकशी करत असतात.पोलीस बांधवांना covid संक्रमण होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी कळंबोली मुख्यालयात 50 बेड चे “निवारा” आणि नेरूळ येथे 40 बेड क्षमता असणारे “सावली” अशी सेंटर्स सुरू केली.यामध्ये लक्षणे असलेले आणि लक्षणे नसलेले असे वर्गीकरण केले आहे.10 जून रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या केंद्रांचे उद्घाटन केले होते. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस कर्मचारी,अधिकारी यांचे विलगिकरण,औषधोपचार आणि देखभाल येथे घेतली जाते.याकामी तैनात टीम मधील पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील,सहा.आयुक्त विनोद चव्हाण, व पो नी एन बी कोल्हटकर,रवींद्र बुधवंत,अर्जुन गरड यांचे काम देखील तितकेच वाखणाण्या सारखे आहे.
आयुक्त संजय कुमार यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याबद्दल रवीशेठ यांनी कृतज्ञता व्यक्त करताना अनेक आठवणींना वाट मोकळी करून दिली.संजय कुमार यांच्या वक्तशिरपणा बद्दल त्यांचे कौतुक करताना उलवे मॅरेथॉन उद्घाटन समईचा किस्सा त्यांनी ऐकवला. पोलीस दलातील बांधवांच्या साठी एक कुटुंब प्रमुख या नात्यातून खंबीर आधार देणार्या संजय कुमार यांच्या या कार्याला “हॅट्स ऑफ” म्हणावेच लागेल असे रवीशेठ पाटील यांनी सांगितले.
Be First to Comment