Press "Enter" to skip to content

कविता

कविता

कधी षोडशवर्षीय तरुणी
असते कविता
तर कधी तरणाबांड युवक असते कविता

कधी नववधू स्वप्नाळू असते कविता
तर कधी स्वप्नपूर्तीचा आनंद असते कविता

कधी अंगाई असते कविता
तर कधी बोट धरून चालविते कविता

कधी भांडण असते कविता
तर कधी समेट असते कविता

कधी आयुष्याचा पूर्वार्ध असते कविता
तर कधी उत्तरार्ध असते कविता

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर असते कविता
म्हणूनच सर्वांची असते कविता

अशा कवितांमुळे जगणे सुंदर आहे
म्हणून आयुष्यात कविता असणे गरजेचे आहे

अनघा अंबपकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.