Press "Enter" to skip to content

एस एस सिनेव्हीजनतर्फे टिएसपिएल ग्रुपला सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

भारतासह अन्य 18 देशा मधील एकूण 5000 ह्युमन रिसोर्स अधिका-यांकरिता टिएसपिएल ग्रुपच्या माध्यमातून 450 तासाचे प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास क्षेत्रात जागतिक विक्रम प्रस्थापित करून लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे TSPL Group चे संचालक महेबुब सय्यद आणि टाइम्स ऑफ पुणेचे आदम सय्यद यांचा पुण्यातील पार्क इस्टिक या पंचतारांकित हॉटेल मध्ये मराठी चित्रपट प्रोडक्शन हाऊस “एस एस सिनेव्हिजन” तर्फे दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करून या कामगिरीचा गौरव करण्यात आला.

यावेळी मोहोपाडा रसायनी येथे शिक्षण घेवून पुढे निर्माता निर्देशक सिकंदर सय्यद आणि त्यांच्या आगामी मराठी चित्रपट “भुईमुगाची फूले “चे कलाकार
यांनी TSPL Group च्या या कामगिरीचे कौतुक केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी TSPL Gruop चे रुमा सय्यद आणि पुरुषोत्तम गायकवाड उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.