हे नाते जन्माचे….
नाते भावा बहिणीचे
असते जन्म भराचे…
नसते त्याला किनार अपेक्षांची
असते झालर फक्त प्रेमाची…
एक असतो आधार आदृश्य
प्रेमभावना सदृश सापेक्ष
सुख दुःख जेंव्हा येते अनुभवास
येते आठवण तयांची प्रत्येक क्षणास
दूर असो अंतरावर कोसो मैल
जवळच ते भासवती सहवास
प्रेमाचे धागे असती असे अनमोल
कीर्ती नात्यांची राही अनंतकाल मिलिंद मोघे, पनवेल







Be First to Comment