Press "Enter" to skip to content

वाचा नंदकुमार मरवडे यांचा वाढते अपघात व वाहन सुरक्षा यावर प्रकाश टाकणारा लेख

“रस्ते अपघात व वाहतूक सुरक्षा”

सिटी बेल लाइव्ह / वाचन कट्टा

रस्ते अघतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. अपघात घडला नाही असा एकही दिवस उजाडला नाही.अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर निष्पाप नागरिकांचे बळी जातात. दिवसेगणिक होणाऱ्या अपघाताला असुरक्षित रस्ते जसे कारणीभूत आहेत. तसेच आपली बेपर्वाही व्रुत्तीही तितकीच कारणीभूत आहे.
वाहनावर देवाचे चित्र काढून किंवा
तो प्रसन्न असे लिहून, चपला , काळ्या बाहूल्या , लिंबू मिरच्या अडकवून अपघात टाळता येत नाहीत , तर सावधानतेने वाहन चालवण्याने ते टाळता येतात.वाहनांची वाढलेली संख्या ,रस्त्यांची दूरावस्था आणि मर्यादा , चालवणारे बेफिकीर , हातात मोबाईल किंवा कानात हेडफोन आणि सतत कोणत्यातरी रंजक विश्वात हरवलेली मानसिकता,टेन्शन या कारणामुळे दररोज अपघाताने अनेक घरे उध्वस्त होत आहेत .लहान मुलांच्या हातात वाहन देण्याचे गंभीर परीणाम दिसत आहेत आज वाहन आणि मोबाईल नाही असा माणूस विरळ आहे आणि ही जोड आजच्या अपघाताचे प्रमुख कारण ठरत आहे .
दारू पिऊन वाहन चालवण्यामुळे जेवढे अपघात होत आहेत , त्याच्यापेक्षा शंभरपट आपघात आज मोबाईलमुळे होत आहेत. विज्ञान सांगते कि माणसाचे शरीर एकावेळी दोन किंवा अनेक कामे करू शकते पण मन एकाग्र हे फक्त एकाच कामात होऊ शकते . त्यामुळे एकाचवेळी अनेक कामे करणारे शरीर कोणत्याच कामात एकाग्र नसते , हेच अपघाताचे प्रमुख कारण आहे. आपले मन गाडी चालवत असताना एकाग्र असावे लागते आणि शरीर सावध असावे लागते , कारण रस्त्यावर तुम्ही एकटे नसतात , दुसरा तुमच्या वाहनावर येऊ शकतो , म्हणून सावध असावे . आपले वाहन रस्त्यावर उभे केले तर इंडीकेटर लावायला विसरू नये . डोक्यात अनेक विचार चालू असतील किंवा टेन्शन असेल तर वाहन चालवायला बसू नये .आपण एकुलते एक आहोत किंवा आपल्यावर घर अवलंबून आहे आणि रस्त्यावर वाहन चालवणारा प्रत्येकजण असाच आपल्यासारखा आहे , हे वाहन चालवताना कधीच विसरू नये . वेगाने कदाचित लवकर पोहचता येईल , पण सावधानतेने सुरक्षित पोहचता येते , हे लक्षात असू द्यावे . चालू गाडीत मोबाईल घेतला तर एकाग्रता रहात नाही ,
वाहन बाजूला उभा करून , इंडीकेटर चालू करून फोन घ्यावा किंवा करावा , वाहनाची संख्या आपल्या हातात नाही , रस्त्याची अवस्था आपल्या हातात नाही , पण आपली गाडी आणि मोबाईल आपल्याच हातात आहे , सावधानता आणि एकाग्रता आपल्याच हातात आहे .
आज आपण स्वतः सुखरूप घरी पोहचलो तरी अनेकांचे जीव वाचवल्याचे पुण्य पदरात पडणार आहे .

श्री.नंदकुमार मरवडे,
श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी,
ता.रोहे,जि.रायगड.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.