Press "Enter" to skip to content

निर्भया??

निर्भया??😢

रोजचेच हरणे, मिटणे आणि केवळ सहनच करणे ..
का नच शिक्षा नराधमांना? नशिबी केवळ रडणे ?

उघड्या नयने काय पाहतो ?जळणे आणि विव्हळणे …
उमलत्या कळ्यांना राजरोस ते असे खुडूनि टाकणे ?

कसले शिक्षण देतो आम्ही ?कुचकामी ते ठरले
नकार नाही पचतच यांना, म्हणुनि उभे जाळणे ?

पराकोटीचे क्रौर्य घडे ,परि शांत कसे हे सगळे ?
का यांना अम्ही निवडून द्यावे?संधिसाधू ते बगळे ..

न्यायव्यवस्था अंध आमुची , पाही न डोळसपणे ..
दुष्ट हिंडती वर मानेने , मुश्किल इथले जिणे ..

अगतिकतेने हतबल होऊन ,किती किती साहणे ?
जगायचे नाकारुनी हाती ,अमुच्या केवळ मरणे ???

ऊर्मिला ताम्हनकर, सांगली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.