सिटी बेल लाईव्ह/ पेण.
पेण चे साहित्यिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास गडकरी यांच्या 'लॉक डाउन मधील कविता 'या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले.पुण्यातील महाजन ब्रदर्स ने तयार केलेल्या या एकशे विस पानी पुस्तकात एकूण सत्तर कविता संग्रहीत आहेत.
आपल्या काव्यसंग्रहा विषयी बोलताना श्री. गडकरी म्हणाले की “या साऱ्या लॉक डाउन मधे लिहिलेल्या कविता आहेत व त्या त्याच क्रमाने दिनांकनुसार घेतल्या आहेत. एक प्रकारे ही त्या अभूतपूर्व काळातील मनाची स्पंदने आहेत. हा काळ कसाकसा बदलत गेला काय घडामोडी घरात व घरा बाहेर घडत गेल्या याचे चित्रण आहे. अर्थात केवळ याच विषयावरच्या कविता त्यात नाहीत इतरही त्या काळात लिहिलेल्या कविता त्यात आहेत.
काव्यसंग्रह प्रकाशना निमित्त ज्येष्ठ साहित्यिक ऐ. के. शेख, महेश केळुस्कर, बाबू फिलिप्स डिसोझा, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हबीब खोत, सतीश पोरे, संदेश गायकवाड इ नी त्यांचे अभिनन्दन केले. अधिक माहिती साठी 09130861304 या क्र वर संपर्क साधवे असे सांगण्यात येतं आहे.
Be First to Comment