Press "Enter" to skip to content

जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयात गुढीपाडव्या निमित्त विजयाची शोभायात्रा

प्रतिनिधी आवरे( सचिन पाटील) गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस (चैत्र शुद्ध प्रतिपदा) असून तो विजय, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. यादिवशी घरोघरी कडुलिंब, साखरेच्या गाठी आणि तांब्या लावून गुढी उभारली जाते, जी प्रभू श्रीरामाचे अयोध्येत आगमन किंवा शालिवाहन राजाच्या विजयाची आठवण सांगते. हा सण चैत्र महिन्याच्या सुरुवातीला येतो आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. गुढीपाडव्याचे महत्त्व दर्शवणारे व नवीन वर्षाची सुरुवात हिंदू सांस्कृतिक परंपरा ह्या समाजासमोर आणण्यासाठी जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालय आवरे हे सतत अनेक प्रकारचे उपक्रम हे शाळेमध्ये राबवत असते याचेच उत्तम उदाहरण आज विजयाची गुढी उभारून गुढीपाडवा निमित्त विजयाची शोभायात्रा ही आवरे गावात काढण्यात आली.

सुरुवातिला शाळेमध्ये कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन शाळेजवळ गुढी उभारून व कार्यक्रमाचे अतिथी प्रमूख मान्यवर माऊली घोड्याचे मालक श्री प्रशांत घरत आणि प्रदीप वर्तक व या विभागातील फेमस युट्युबर प्रेम म्हात्रे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले तसेच आज उपस्थित असलेले माऊली घोड्याचे सर्वेसर्वा श्री प्रशांत घरत हे अशोक ठाकूर सर हे आजच्या कार्यक्रम प्रसंगी नाहीत अस स्वप्नात ही वाटलं नव्हतं त्यांचा स्वर्गवास हे दुःख मनाला न पटण्यासारखे आहे म्हणून सुरुवातीला भावना विवष झाले आणि त्याने म्हटले की मी आज केवळ आणि केवळ अशोक ठाकूर सर यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलो आहे.

सुरवातीला संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली विजयाचे प्रतिक म्हणून ही विजयाची गुढी व शोभायात्राही मोठ्या उत्साहाने आवारे गावात हिंदूधर्मातील धार्मिक
देवदेवतांच्या प्रतिमूर्ती श्रीगणेश , श्री राम लक्ष्मण माता सीता हनुमान महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मावळे व विविध सांस्कृतिक परंपरा दर्शवणारी वेशभूषा ही ढोलांच्या तालवार ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाच्या गजरात गावात काढण्यात आली तसेच समाज प्रबोधन पर संदेश म्हणून सांस्कृतिक परंपरा बऱ्याचशा विद्यार्थिनींनी स्व संरक्षण काठी प्रात्यक्षिक केले व नववर्षाच्या स्वागतपर लेझीम तालावर पद दालित्य नृत्य अशा विविध सांस्कृतिक परंपरांचा अंतर्भाव असलेले नृत्य व प्रात्यक्षिके केले व हा सोहळा मोठया दिमाखात न भूतो भविष्यती अशी विजयाची शोभायात्रा ही विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेऊन साजरी केली.

जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मिडियम हे विद्यालय आवरे गावात नव्हे तर पंचक्रोशीतील उपक्रमशील विद्यालय म्हणून या पंचक्रोशीत विद्यालयाची ख्याती आहे यासाठी शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्यार्थी तसेच आत्माराम ठाकूर मिशन व्यवस्थापन कमिटी चे सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळ आवरे यांचा या उपक्रमास अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांचे एक स्वप्नच होतं की विद्यार्थ्यांना फक्त चार भिंतीमध्ये शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा विद्यालयातील प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग दर्शवणे होय व ते उपक्रम साजरे करणे हे अभ्यास पूरक अध्ययन होय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ माधवी म्हात्रे यांनी केले तसेच आभार प्रदर्शनाचे काम सहाय्यक शिक्षिका सौ मानसी ठाकुर यांनी केले व सहायक शिक्षक श्री अनिल पाटील सर यांनी गुढीपाडवा निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले अशा प्रकारे आज गुढीपाडवा निमित्त जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे विद्यालयाची विजयी शोभा यात्रा ही विद्यालयात संपन्न झाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या मेहनतीने हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.