अटल करंडकाच्या अंतिम फेरीला सुरुवात
अंतिम फेरी मध्ये तब्बल चोवीस एकांकिका सादर होणार
अंतिम विजेत्या एकांकिकेला 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक
सिटी बेल लाईव्ह/ पनवेल.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगु काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धांच्या अंतिम फेरीला आज सुरुवात झाली. सदर स्पर्धे करिता शेकडो अर्ज आले होते त्यातील निवडक 75 एकांकिकाना स्पर्धेमध्ये संधी देण्यात आली. प्राथमिक फेरीच्या प्रयोगानंतर 24 एकांकिका अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात आल्या आहेत. शुक्रवारी 9 एकांकिका, शनिवारी 9 एकांकिका तर रविवारी सहा एकांकिका पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये सादर करण्यात येणार आहेत. वसई येथील ओम साई कलावंत मंच यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या क्लिक या एकांकिके पासून अंतिम फेरीच्या प्रयोगांना प्रारंभ करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर,आद्वैत दादरकर आणि ऋजुता देशपांडे हे अंतिम फेरीतील स्पर्धेकरिता परीक्षकांच्या भूमिकेत उपस्थित होते. अटल करंडक स्पर्धेच्या आयोजनाबाबत मुख्य आयोजक तथा महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षक मंडळाचे सदस्य शामनाथ पुंडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली…
पहा शामनाथ पुंडे, स्पर्धा सचिव व प्रमुख कार्यवाह अ भा म नाट्यपरिषद पनवेल शाखा यांच्याशी केलेली बातचीत







Be First to Comment