नेटपॅक चॅनेल दिशादर्शक ठरेल : आमदार प्रशांत ठाकूर
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
सध्याच्या युगात नेटपॅक चॅनेल आबालवृद्धांना दिशादर्शक ठरेल असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. चांगु काना ठाकूर महाविद्यालय खांदा कॉलनी येथे नेटपॅक चॅनेल चे उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
पनवेल महानगरी मध्ये समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक आहेत. विविध प्रकारचे सांस्कृतिक, कला कार्यक्रम होत आहेत. रेल्वे च्या सोयीमुळे मुंबई मध्ये काम करणारे अनेक जण पनवेल मध्ये राहतात.इथे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.लवकरच आद्य क्रांतिकारक वासुदेव बलवन्त फडके नाट्यगृहात नाटके होणार आहेत.कोरोना मुळे 2020 साल असेच गेले. मात्र 2021 मध्ये येणाऱ्या संधीचा योग्य सदुपयोग करा असे आवाहन त्यांनी केले.
पनवेल चे महानगर झालंय, क्षेत्र व्यापक बनत चाललंय.या चॅनेल च्या माध्यमातून पनवेलचा विकास होईल. आगरी कोळी संस्कृती चे संवर्धन होईल.तुमचा नवीन सहकारी वैभव महाडिक नवा टप्पा गाठतोय.त्याला सहकार्य करा असे सांगून शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचकावर गायक नंदेश उमप, चित्रपट कलावन्त महेश खुटे, नेटपॅक चॅनेल चे वैभव महाडिक, जेष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील, श्रावण क्वीन मानसी म्हात्रे, संगीतकार बिपिन वर्तक, सिने कलाकार संकेत कोर्लेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

गायक नंदेश उमप यांनी सांगितले की, त्यांचे बाबा विठ्ठल उमप यांनी पनवेलकरांसाठी 2 कार्यक्रम केले . नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे असेही ते म्हणाले .यावेळी त्यांनी हम होंगे कामयाब हे गाणी म्हटले. नेटपॅक चॅनेल चे वैभव महाडिक म्हणाले की, आमदार प्रशातदादा यांच्या आशीर्वादाने माणसे जोडली जात आहेत. मनोरंजनातून प्रबोधन, समाजप्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
नेटपॅक हे एक ओटीटी प्लॅटफॉर्म ..ज्यात फिल्म, शॉर्ट फिल्मस, गाणी आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय लोकसंगीत आणि रॅप चा लोकांना आस्वाद घेता येणार आहे.यात प्रामुख्याने मराठी हिंदी गुजराती तेलगू आशा भारतीय भाषांमधील कंटेंट चा समावेश असणार आहे….पण हे महाराष्ट्रीयन मुलांनी बनवलेले असल्याने संपूर्ण जगात मराठी माणसाचे ऑनलाइन चॅनेल म्हणूनच ओळखले जाईल.








Be First to Comment