सिटी बेल लाइव्ह । विठ्ठल ममताबादे ।
रायगड मधील पेण चा सूपूत्र रुपेश पाटील मनोरंजनाच्या दूनियेत दिग्दर्शक म्हणून आपली छाप पाडत आहे.चंदेरी दुनियेतील मनमिळावू दिग्दर्शक म्हणून ते नावाजले आहेत.आत्तापर्यंत 15 हून आधीक गाजलेल्या मालीकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.तर सध्या सोनी मराठी चॅनल वर संध्याकाळी ७.३० वाजता चालू असलेल्या “तू चांदणे शिंपीत जाशी” या मालिकेेचे दिग्दर्शन ते करत आहेत.रायगड जिल्ह्याचे नाव उंच शिखरवार नेणारे रुपेश पाटील हे चंदेरी दुनियेतील एक यशस्वी दिग्दर्शक आहेत.
“फिल्म फार्म इंडिया प्रा. ली. प्रोडक्शन हाऊस” च्या सध्या सोनी मराठी वरील “तू चांदणे शिंपीत जाशी” या मालिकेेत सचित पाटील, नागेश भोसले, अमृता धोंगडे, उत्कर्षा नाईक, प्रसाद पंडित, विद्या करंजीकर, पंकज विष्णू, शलाका पवार, विदिषा म्हसकर, भूषण तेलंग असे मोठी आभिनेते व आभिनेत्रींची टिम असतानाही त्यांच्या आभिनयाला आपल्या सहज सुंदर दिग्दर्शनात रुपेश पाटील हे सहज गूंफीत आहेत. त्यांची दिग्दर्शनाची शैली कलाकारातील उत्साह वाढविणारी आहे. आतिशय शांत व मनमिळावू पद्धतीने आपल्या दिग्दर्शनाची एक वेगळीच छाप पाडून कलाकारांकडून उत्तम पद्धतीने काम करून घेण्याची कला त्यांच्या अंगात दिसून येते.
पेण तालुक्यातील पाटणी – कासू या गावात जन्मलेले व पेण मध्येच आपले कॉलेज पर्यंत चे शिक्षण घेवून चंदेरी दुनियेत त्यांनी प्रवेश केला.या प्रवासात त्यांना त्यांचे गुरू बंधू दिग्दर्शक आशिष पाटील यांचे लाखमोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. सहदिग्दर्शक ते दिग्दर्शक या त्यांच्या प्रवासात मोठे बंधू अमित पाटील यांची साथ ही महत्वाची ठरली आहे. त्यांच्या या योगदानाने चंदेरी दुनियेत रायगड जिल्ह्याचे नाव उंच शिखरावर नेण्याच काम रुपेश पाटील यांनी केल आहे.त्याच बरोबर चंदेरी दुनियेला रायगड जिल्ह्याने रुपेश पाटील यांच्या रुपाने एक उत्तम दिग्दर्शक दिला आहे.या रायगड च्या सूपूत्राला रायगड भूषण हा पुरस्कार नक्कीच मिळायला हवा आशी रायगड च्या जनतेची मागणी आहे.
दिग्दर्शक रुपेश पाटील यांनी या अगोदर दिग्दर्शित केलेल्या मालिका
“ह्या गोजिरवाण्या घरात”,
“पुढचं पाऊल”,
“असावा सुंदर स्वप्नांचा बंगला”,
‘लक्ष्य’,
‘सखी’,
“माझिया माहेरा”,
‘कमला’,
“गर्ल्स हॉस्टेल”,
‘वर्तुळ’,
” परफेक्ट पती”,
“लग्नाची वाइफ वेडिंग ची बायकु”,
” रंग माझा वेगळा” ,
“तू चांदणे शिंपीत जाशी”












Be First to Comment