Press "Enter" to skip to content

वैजनाथ येथे रात्र आरंभ या लघुचित्रपटाचे चित्रिकरण

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे तालुक्यातील ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेल्या व घेरासूरगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वैजनाथ या गावी रात्र आरंभ या लघुचित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.

मुकुंद मोरे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची मूळ कथा-पटकथा किरण शिंदे यांनी लिहिली. तर मनोज येरूडकर यांची या चित्रपटाबाबत मूळ संकल्पना असून चित्रपटाचे छायाचित्रण कपिल अडोळे यांनी केले. तसेच रंगभूषा, वेशभूषा किरण शिंदे यांनी केली.वैजनाथ येथील पुरातन नेनेवाडा येथील संपूर्ण वाड्यात या चित्रपटाची स्वीटिंग पुर्ण करण्यात आली असून याकामी येथील सामाजिक कार्यकर्ते व कलाकार विलास धामणसे व रवी मोहिते यांचे लाभले.

त्याचप्रमाणे संपूर्ण लाईट व्यवस्था ही येथील अनंत धामणसे यांनी पाहिली.
रात्र आरंभ हा लघूचित्रपट भयपट या प्रकारातील असून मराठी चित्रपट स्रुष्टीतील नावाजलेले स्टायलिश स्टार नायक विजय गीते यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले वैजनाथ या गावाला निसर्गाचं भरपूर देणं लाभलं असून या गावात पुरातन दगडी बांधकाम केलेले अनेक वाडे आजही नरजेस भरतात. तर शंकर मंदिर परिसराय असलेले विस्तीर्ण तलाव व मोठ्या प्रमाणावर असलेली मोठमोठी झाडे येथील सौंदर्यात अधिकच भर घालत आहेत. त्याचप्रमाणे ऐतिहासिक घेरासूरगड जणूकाही वैजनाथ गाव व घेरासूरगड वासियांचे संरक्षण करण्यासाठी अनेक शतकांपासून उभाच असल्याचे दिसून येते.रात्र आरंभ या भयपटाचे संपूर्ण स्वींटींगचे काम सायं.७ ते पहाटे ७ वा. पर्यंत सलगपणे पुर्ण करण्यात आले.

लवकरच हा लघुचित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार असून हा भयपट नक्कीच प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास दिग्दर्शक मुकुंद मोरे यांनी या चित्रपटाबाबत माहिती देताना पत्रकारांना सांगितले. तर वैजनाथ सामाजिक कार्यकर्ते व कलाकार विलास धामणसे यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या वैजनाथ गावचे नाव महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपा-यात पोहोचले जाईल तर लवकरच एका नवीन चित्रपटाची स्वीटिंग देखील आमच्याच गावात होणार असल्याचे शेवटी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.