गोडवा तिळाचा (लघुकथा)
१) ती – :तुझ्या स्वभावाला मॅचिंग म्हणून नेहमी अबोलीचाच गजरा माळते मी.
आज परातभर तिळगुळ केलाय..
यापुढे अबोलीचा गजरा अजिबात माळणार नाही हं.. सांगून ठेवते
२)तो – :तुझ्यापेक्षा जास्त गोड कोणीच नाही.
अगदी तूच बनवलेल्या तिळगुळापेक्षाही!!
मला पूर्णपणे खात्री होती
आणि मग…
आपली लेक जन्माला आली..
३)तो :-आज तुझ्याशी भरभरून पण गोडच बोलायचे असा मी विचार करतच होतो..
तू काळी चंद्रकळा नेसून सामोरी आलीस……
आणि मी काही बोलायचेच विसरून गेलो..
4). ती – :तुझे कॅलरीजचे गणित चुकत असेल तर भले तिळगुळ खाऊ नको..
जमत नसेल तर माझ्याशी गोड बोलू नको. पण….
आपल्या नात्यातला तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा मात्र हरवू देऊ नको..
समिधा गांधी, पनवेल







Be First to Comment