जागतिक इमोजी दीन…
17 जुलै हा जगभरात ईमोजी दीन म्हणून पाळला जातो…हे वाचल्यावर आता हे काय नवीन फॅड असे म्हणत मारला ना डोक्यावर हात, पण हा दिवस 2014 पासून साजरा करण्यात येतोय.संवाद रहित संभाषण रंजक बनविण्यात या ईमोजी चा खूप मोठा वाटा आहे.
वास्तविक मोबाईल च्या येण्याने आपण टच मध्ये असतो पण त्यात गाठी भेटीचा ओलावा नसतो, क्षणा क्षणाचे अपडेट ठेवतो पण त्यात संवेदना नसते…नेमकी त्याच संवेदनांची उणीव या ईमोजी भरून काढतात…
खूपदा अपसेट असताना एखादी ईमोजी चटकन मुड हलका करते…खूपदा आपण बिझी असताना आपल्या भावना एका सेकंदात पोहोचवते…कधी कधी नुसत्या इमोजींनी अख्खे संभाषण केले जाते…तर तुमची फेवरेट ईमोजी कोणती???टाका बरे कमेंट मध्ये…
Be First to Comment