आठव
दे साथ तुझी अलवार
का गहिवरतो तो सूर
मग मनासही उमजेना
मनी दाटून ये काहूर
कोमल स्पर्शातून यावा
हळुवार तुझा तो गंध
ना समजून काही येता
तो फक्त श्वास आतुर
तो आठव दाटून येता
पापणीच भिजूनी जाई
पाहताच वळुनी मजला
मग भरुनी जाई तो उर
सई मराठे, पनवेल

आठव
दे साथ तुझी अलवार
का गहिवरतो तो सूर
मग मनासही उमजेना
मनी दाटून ये काहूर
कोमल स्पर्शातून यावा
हळुवार तुझा तो गंध
ना समजून काही येता
तो फक्त श्वास आतुर
तो आठव दाटून येता
पापणीच भिजूनी जाई
पाहताच वळुनी मजला
मग भरुनी जाई तो उर
सई मराठे, पनवेल
Be First to Comment