Press "Enter" to skip to content

चैतन्याच्या गाभाऱ्यात

चैतन्याच्या गाभाऱ्यात

उगवले नारायण गगनी
हसे गालात ती अवनी
डोले तुळस वृन्दावनी
वसे तिथे चक्रपाणी

कुणी करती सडा-संमार्जन
कुणी करती नामस्मरण
वासुदेवाच्या रूपानं
दर्शन देती भगवान.

उन्हे खेळती शेतात
दाणे भरती कणसात
आशेच्या अंकुराचे
रोप वाढते मनात

निसर्गाचे सारे देणे
डोळे भरती आनंदाने
चैतन्याच्या गाभाऱ्यात
सुखाचे ते होई जीणे.

संध्या करंदीकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.