।। प्रश्न।।
पूर्वी प्रश्न सोपे होते,
उत्तर पण येत होते.
मी कोण हे तुम्हाला माहित होते.
तुम्ही कोण हे मला माहित होते.
कारण प्रश्न आपले होते,
उत्तर पण सुंदर होते.
आज प्रश्न विषारी,
उत्तर सुचेना.
मी कोण
हे मलाही समजेना.
मन अस्वस्थ झाले,
आक्रोश वाढला.
स्वतःला दोष द्यावा,
की समाजाला ?
प्रश्न तोच,
उत्तरे अनेक.
अजमल पठाण, हैदराबाद







Be First to Comment