आई.
आई असते बाळाची पहिली शाळा
मिठीतली अंगाई लळा.
कुशीतली चिऊ काऊ ,
भरवते घास च्याऊ म्याऊ,
बाळ असत जीव की प्राण, बाळ तिची शान.
आईशी जोडली असते नाळ ,
सर्वस्व तिचं बाळ ,
बाळच चंद्रसूर्य आभाळ.
आई अन बाळाचं नातं सुंदर ,
आयुष्यभर अपार माया निरंतर, भावनेचा सागर,
त्याग कर्तव्याच आगर ,
आई असते आभाळमाया,
तिचे पाई काशी प्रयाग गया, आई म्हणजे जीवनाचे सार , वात्सल्य जीवन अपार.
आई बाळाचं नातं घट्ट ,
तीच पुरवते बाळाच हट्ट .
आई म्हणजे ढगाळलेले आभाळ…. फुटलेला पान्हा.. मायेची फुंकर…गारगार हिरवळ.
आई अनमोल खजिना,
करमत नाही तिच्या विना.
आई म्हणजे त्यागाची मूर्ती कौतुक कष्ट, प्रेरणा, स्वप्नपूर्ती आई म्हणजे मांगल्य…..!
माया वात्सल्य………… !
पूर्णिमा शिंदे, मुंबई







Be First to Comment