प्रतिबिंब स्वभावाचे….
हसत खेळत जगणं
दिवास्वप्न झाले
गुंता करून जगणं
सहज सुलभ केले
दोष दुसऱ्या माथी मारून
स्वार्थ साधत गेलो
संसाराच्या पटावर
फसत असा गेलो
आरसा आपल्या अंतरीचा
कृतीत दिसत असतो
प्रतिबिंब स्वभावाचे
छाप पाडत असतो
वेडा बनून पेढा खाणे
कायम जुळत नसते
कळले नाही कधी कसे
चुकत कसा गेलो
गोड बोलून गोड वागणे
हरवून कसा बसलो
उतारवयात ध्यानी आले
एकटा का पडलो?
उतारवयात ध्यानी आले
एकटा का पडलो?
अनंत खोत, विलेपार्ले, मुंबई







Be First to Comment