रंगबंध
रंग रांगोळीचे सजले
आज असे माझिया दारी।
स्वप्नांची माळच नटली
जणू सखे माझ्या अंतरी।
रंग होते साठले मनी
पसरले तेच अवनी।
हर रंग असे स्वच्छंदी
त्यात खुले मन आनंदी।
भरूनी जीवनी हे रंग
उमटावे सुख तरंग।
होऊ अखंड रंगबंध
जगुया जगी सर्वधुंद।
अदिती गोखले, नवीन पनवेल







Be First to Comment