Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : “मी पणती बोलते !”

मी पणती बोलते

मी पणती तेवते दारात

कोपऱ्यात, घर-अंगणात

न भपका, नाही भडका

मंद-शांत तेवणे माहीत...

थोडे तेल, कापसाची वात

मज पुरेसे उजळावयास

ठेवूनी अंधार स्वतः जवळी

जळते तुम्हा देण्यां प्रकाश...

जागा मज जास्त न लागे

कोपरा सुद्धा पुरेसा असतो

जेथे बसते तेथील अंधार

प्रज्वलित होता दूर सरतो...

मी पणती बोलते मानवा

संयमी-शांत वागणे चांगले

कर्माचे फळ ईश्वरां हाती

आपण तेवत राहणे चांगले...

©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.* नवी मुंबई, मो. 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.