नि:शब्द आसवांनी समजाविले मनाला
माझ्याच मी मनाशी बोलाविले मनाला..
हे ही विचार आले ते ही विचार आले
पण भाबड्या विचारे नादाविले मनाला..
सरिताच आसवांची येता विशाल नेत्री
एकेक आसवांनी हेलाविले मनाला..
विश्वास मजवरीचा नव्हता कधीच ढळला
माझ्याच बाहुपाशी कवटाळीले मनाला..
“अनिरुद्ध ” लक्ष्य माझे डोळ्यांचिया समोरी
येताच आत्मकेंद्री मी लाविले मनाला…..
अनिरुद्ध भिडे, पनवेल







Be First to Comment