Press "Enter" to skip to content

भाऊबीज

भाऊबीज

दिन आला भाऊबीज
प्रेम भरलं काळीज
वाटेवरी लावी डोळा
बंधू माझा गुणी भोळा

भाऊमाझा सीमेवर
देशासाठी सज्ज राही
नाही त्यास सणवार
तळ हाती जीव पाही

कार्तिक शुद्ध द्वितीया
झाला दिवाळी कळस
म्हणती यमद्वितीया
डोले दारात तुळस

भाऊ दिसे चंद्रामध्ये
आज त्यालाच औक्षते
पंचप्राणांच्या ज्योतीने
माझे आयु त्याला देते

प्रेम मायेचा गं टिळा
शोभे भावाच्या गं भाळा
आठवानं दाटे गळा
भिजे पदर सगळा

भाऊ येईलच घरी
तोच दसरा-दिवाळी
तोरण बांधूया गं दारी
ताईची माया ही आंधळी

स्वाती लेले, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.