तू लाविलास दीप
उजळून त्या नभाला तु लाविलास दीप
त्या तारकांस तेव्हा तू दाविलास धूप
नक्षत्र चांदण्यांना माळून घे कराने
आशा नव्या सुखाची सजवित येई रूप
दीपावली हसावी नेत्रात या नव्याने
मांगल्य ते सजावे अंधार होत लोप
तेजोमयी पहाट दारी तुझ्या रूपाने
रुपात मी तुझ्या रे होऊनिया अरुप
अश्विनी अनिरुद्ध भिडे, पनवेल







Be First to Comment