Press "Enter" to skip to content

१००% डिस्काउंट सेल

१००% डिस्काउंट सेल

आली दिवाळी लागला सेल|
पैसे जमवून केला ताळमेळ||

आधिच थोडी चणचण |
त्यात ही सर्वत्र लागण ||

द्विधा मनस्थिती झाली उत्पन्न|
आले आहे जवळ त्यात एक लग्न ||

मग म्हंटले जाऊ दे तो अट्टाहास |
लग्नात खरेदी करुया साडी खास||

कसेबसे त्या मोहास आवरले |
मनही ते तसेच सावरले ||

१००% डिस्काउंट मिळेल का कधी सेल|
नाही आवडले तर सोडून देता येईल का ती घालमेल ||

चांगुलपणाचा ही लागुदे सेल वारंवार |
मन करी प्रसन्न सर्वांचे अपरंपार ||

पण वाईट विचारांची झाली जर का लागण |
विलगीकरण करून त्यांचे थांबवा ही पसरण ||

ही दिवाळी आहे सर्वांनाच खास |
शुभेच्छांचा सेल व फराळाचा पसरत आहे सुवास ||

नृपाली जोशी
नवीन पनवेल
९८२२३३०४४८

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.