Press "Enter" to skip to content

“युवोन्मेष” समूहाची ऑनलाईन रागमाला संपन्न 

सिटी बेल लाइव्ह । श्रीनिवास काजरेकर । नवीन पनवेल । 🔷🔶🔷

युवावर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युवोन्मेष’ समूहाच्या वतीने ‘रागमाला’ या शास्त्रीय संगीतावर आधारीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  ‘कलादर्पण’ या संस्थेच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम संपन्न झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन करण्यात आला. पहाटे गायल्या जाणाऱ्या भैरव रागाने रागमालेला  प्रारंभ केला.  त्यानंतर मांड, पहाडी, भीमपलास, मल्हार, भैरवी अशा विविध रागांचे व त्या रागांवर आधारित गीत, गज़ल, अभंग आदी प्रकारांचे गायन व संवादिनीवादन संपन्न झाले. 

युवा शास्त्रीय गायिका चैत्राली देसाई, डॉ. निहारिका भिडे, श्रेयस केळकर, पल्लवी देशपांडे, नेहा आपटे, मयुरेश साठे या युवा गायकांनी या रागमाला कार्यक्रमात सादरीकरण केले. 

निवेदिका संज्योत अंधारे हिच्या अभ्यासपूर्ण व मनोरंजक निवेदनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. प्रसिद्ध छायाचित्रकार समृद्ध खरे याच्या उत्कृष्ठ छायाचित्रण व तंत्रसहाय्याने कार्यक्रम प्रेक्षणीय ठरला.

युवावर्गालाही सुगम संगीताबरोबरच शास्त्रीय संगीतामधेही अभिरुची आहे. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. यासाठी ‘कलादर्पण’ संस्थेने आम्हाला मोलाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. 

संज्योत अंधारे
प्रतिनिधी, ‘युवोन्मेष’

 

       

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.