Press "Enter" to skip to content

संध्या समई

संध्या समई

घनभरलेल्या डोहापाशी
कुणी असावे संध्या समयी
रविकिरणांनी तेवत राहो
डोळ्यातुन ती संध्या समई

नक्षत्रांनी सजवुन जावे
क्षितीज सारे संध्या समयी
नदीघाटाला उजळुन जावी
प्रतिबिंबातुन संध्या समई

टिपुर चांदणे भिजवुन जावे
व्रुक्ष तरुंना संध्या समयी
सप्तरंगल्या इंद्रधनुला
नटवुन जावी संध्या समई

तुझ्या मनातील गूज सांगतो
चंद्र नभातून संध्या समयी
त्याच मनातील आठवणींची
तेवत राहते संध्या समई

केदार जोशी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.