आगरी कोळी समाजाचे आराध्य दैवत श्री एकविरा आई या देवतेवर आधारित ‘गजर आई माउलीचा’ गाणे प्रक्षकांच्या भेटीला 🔶🔷🔶
“प्रवीण घासे ओफिशिअल”
या यूट्यूबवर गाणे प्रक्षेपित 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । उरण । विट्ठल ममताबादे । 🔷🔶🔷
प्रथमच प्रादेशिक पातळीवर भल्या मोठ्या सेटचा वापर करून कोळी गीतात केल्या गेलेल्या व नवरात्रीच्या मंगलदायी वातावरणात एकविरा देवीचे कोळीगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हे कोळीगीत उरण तालुक्यातील मोठी जुई येथील प्रवीण घासे या मराठी माणसाने तयार केली आहे. “गजर आई माउलीचा” असे या गाण्याचे नाव असून सदर गाणे “प्रवीण घासे ओफिशिअल” या यूट्यूब चॅनलवर प्रेक्षक पाहु शकतात. हे कोळीगीत प्रेक्षकांचे मन हर्षित करून जाईल अशी या गाण्यातील कलाकारांची खात्री आहे.
सदर गीता मध्ये प्रशांत नाकती यांचे शब्द या गीतामध्ये असून गायक योगेश आग्रावकर व गायिका स्नेहा महाडिक यांनी गाण्याला आवाज दिला आहे. नृत्यकार तथा रायगड भूषण पपन पाटिल, सचिन कांबळे,पायल पाटिल व दृष्टिता पाटिल या मराठी कलाकारांनी आपले अभिनय व अदाकारी नृत्य या गाण्यात दाखविले आहे.
आगरी कोळयांची देवता म्हणून श्री एकविरा देवीचे महत्व अनन्य साधारण आहे. परंपरेने व भक्ति भावाने समृद्ध अश्या आगरी कोळी संकृतीच्या या आराध्य देवतेवर आधारित गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.प्रवीण घासे निर्मित या गाण्याचे नाव “गजर आई माउलीचा” असे आहे. सुंदर नृत्य, मधुर आवाज, अभिनय आणि भल्या मोठ्या सेटचा देखावा हे या गीताचे खास वैशिष्टये आहे.त्यामुळे हे गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी भावना निर्माते प्रवीण घासे यांनी पत्रकार विट्ठल ममताबादे यांच्याशी बोलताना व्यक्त केले आहे. जास्तीत जास्त भाविक भक्त, प्रेक्षक वर्गांनी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करून आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन निर्माते प्रवीण घासे यांनी सर्वांना केले आहे.








Be First to Comment