Press "Enter" to skip to content

हे जीवन सुंदर आहे

हे जीवन सुंदर आहे

उजाड डोंगरी मेघ दाटले
ऊर धडधडे असे गरजले
अवचित अमृत बरसून गेले
मृदगंधाने श्वास भरले
पुन्हा एकदा उमगले
हे जीवन सुंदर आहे
सप्तस्वरांनी मैफिलीस भारले
कर्ण मधूर तराणे सजले
दृष्टिहीनाचेही डोळे निवले
पुन्हा एकदा उमगले
हे जीवन सुंदर आहे
निसर्गाचे अद्भुत देणे
हिमकड्यांचे कोरीव लेणे
निष्पर्ण वृक्ष मनी उदासले
वसंतासवे कुसुमित जाहले
पुन्हा एकदा उमगले
हे जीवन सुंदर आहे
ग्रीष्माची मी वाट चालले
थकली पाऊले शुष्क मी तहानले
पाणपोईत क्षणिक विसावले
दिव्यांग बालके हाती प्याले सारीले
पुन्हा पुन्हा एकदा उमगले
हे जीवन सुंदर आहे

डॉ.अंजली टकले, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.