या जगात एकच नाव आहे भारतमाता
त्यात जन्मल्या अनेक वीर माता
पण का झाली सबलांची अबला तु
कोणी हिरावले तुझे स्वातंत्र्य
कोणी नाकारले तुझे अस्तित्त्व
कोण करील तुझे रक्षण
सर्व हेवेदावे कायदे नाहीत तुझे
सर्व देश करतो आहे तुझे माझे
हे हातरशी नारी काय झाले तुझे
23 वर्षांचा जुना विरोध उफाळून आला तुझ्या जिवाशी
प्रत्येक घटना शेतीवाद एक तर्फी प्रेम वासना हे घडतंय तुझ्याशी
घटनेच्या मुळाशी न जाता न्याय सुसंगत कोणी करील वार्ता
राजकारण्यांना हवे असतात लोकांना वाटतो हाच खरा राजकर्ता
कित्येक गेल्या तुझ्या आधी त्यात वाटलं तू पण गेलीस हातरशी
समाजात बंधन व नैतिकता राहिली नाही
आपल्या माता भगिनीशी
स्वतःच उभी रहा तू स्वातंत्र्य आणि तुझ्या स्थिरतेशी
मुकुंद इनामदार, नवीन पनवेल







Be First to Comment