रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची धडाकेबाज कारवाई : कर्जत येथील दोघांसह 11 जणांना अटक 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔶🔷
सध्या भारतातील अत्यंत लोकप्रिय क्रीडा स्पर्धा असणारी इंडियन प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा दुबई , शारदा, व अबुधाबी येथे खेळविली जात आहे. जगातील क्रिकेट प्रेमींचे अमाप मनोरंजन करणारी ही क्रिकेट स्पर्धा कधी सुरू होते. याची जितकी उत्सुकता लागलेली असते तितकीच उत्सुकता या दरम्यान सट्टा खेळणाऱ्या बुकींग ला असते.
दिनांक 19 सप्टेंबर 2020 रोजी इंडियन प्रीमियर लीग 2020 ला सुरवात झाली. त्या पाश्वभूमीवर रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर , अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ,यांनी सदर स्पर्धेवरून बेटिंग (सट्टा) लावणाऱ्यावर विशेष लक्ष ठेऊन आशा काही हाल चाली आढळून आल्यास कारवाई करण्याकरिता रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक जे ए शेख यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी आपले गोपनीय बातमीदार यांना सतर्क केले होते.
अशाच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 1/10/2020 रोजी 22.20 वाजता रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक जे ए शेख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मौजे खांडपे ता. कर्जत येथील हॉटेल 007 युनिव्हर्स रिसोर्ट च्या रूम नंबर 120 मध्ये छापा टाकून त्या ठिकाणी आरोपित 1)कांती करमसी भाई वारसुंगीया, (43)रा.कोपरी ठाणे, प्रकाश पोपट पुजारी, (42)रा.मुलुंड मुंबई, असे दोघेजण आयपीएल मधील किंग्ज इलेव्हन पंजाब व मुंबई इंडियन्स या दोन संघामध्ये सुरू असणाऱ्या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून सट्टा खेळण्यासाठी वापरात असलेले पाच मोबाईल फोन्स, कलक्युलेटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अधिक तपासात उघड झाले की आरोपीत हे वेगवेगळ्या मोबाईल फोनच्या माध्यमातून वेगवेगळ्या मोबाईल एप्स व आयडीच्या मदतीने आयपीएल क्रिकेट सामन्यात satta खेळत होते. वरील दोन्ही आरोपीत यांच्याकडून 20 मोबाईल आयडीची माहिती मिळून आलेली असून या मोबाईल आयडी पैकी 04 मोबाईल आयडी या आरोपीत यांनी satta खेळण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या मोबाईल मधील सिम कार्ड इतर कोणातरी व्यक्तीच्या नावे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात कर्जत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड शाखा करीत आहे.
Be First to Comment